भाजपच्या दोन याद्या जाहीर पण नावच नाही, उदयनराजे भोसलेंचा अप्रत्यक्ष इशारा काय?

| Updated on: Mar 17, 2024 | 12:18 PM

सध्या आपल्याकडे विमान, सिनेमा आणि ट्रेनचं तिकीट आहे पण इतर तिकीटांचं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. दरम्यान, उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत

मुंबई, १७ मार्च २०२४ : साताऱ्यात अजूनही भाजपनं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी का जाहीर केली नाही, म्हणून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिलाय. भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी नाही दिली तर त्यांना अपक्ष म्हणून उभं करू, असा इशाराच समर्थकांनी दिलाय. त्यानंतर स्वतः उदयनराजे भोसले यांनी आपण राजकारणातून संन्यास घेणार नाही, असे म्हणत त्यांनी समर्थकांच्या मागणीला बळ दिलंय. सध्या आपल्याकडे विमान, सिनेमा आणि ट्रेनचं तिकीट आहे पण इतर तिकीटांचं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. दरम्यान, उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राजेंनी व्यक्त केली.

Published on: Mar 17, 2024 12:18 PM
नेमकं कोणाचं सरकार? 4 जूनला फैसला, महाराष्ट्रात 48 जागांवर कुठं, कधी मतदान?
लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘हा’ आमदार बांधणार शिवबंधन