‘भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार’, राज्यातील एका बड्या नेत्याचा मोठा दावा काय?

| Updated on: Jun 11, 2023 | 7:02 AM

VIDEO | गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना हटवणार, कुणी केला मोठा दावा?

मुंबई : भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार आहे. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे, असा मोठा दावा महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे, असाही आरोप एकनाथ खडसे यांनी केला. जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत, असंही खडसे म्हणाले आहेत. “भाजप आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी उघडकीस येत आहेत. भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रामधील शिवसेनेचे जे 5 कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे, अशी भूमिका घेतल्याची बातमी समोर येत आहे”, असं खडसे म्हणाले. तर हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असं भाजपवाल्यांना वाटतंय. एकतर भाजप कार्यकर्त्यांचं हे काम करत नाहीत. त्याचं त्यांच्याशी जमत नाही. त्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यांच्यावरही ठपका ठेवलेला दिसतोय

Published on: Jun 11, 2023 07:02 AM
Special Report | शरद पवार यांची खेळी; ताई कार्यकारी अध्यक्ष, अजित दादांचं काय?
भाजपने नांदेडमधून लोकसभेचं फुंकलं रणशिंग, अमित शहा यांच्याकडून ‘इतक्या’ जागा जिंकण्याचा संकल्प