‘तिचं एकच मला सलमान खानसोबत लग्न करायचंय?’, फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेबद्दल भाजप महिला नेत्याचा दावा

| Updated on: Sep 27, 2024 | 6:39 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी संबंधित महिलेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या महिलेला सलमान खान सोबत लग्न करायचं आहे, असा दावाही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेबदद्ल मोठा दावा करण्यात आला आहे. या महिलेची ओळख पटली असून ही महिला मनोरूग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी मोठा दावा केला आहे. ”ही महिला पूर्ण सोसायटीसाठी डेंजर आहे. तिचं कुणीच नाही. ती एकटी राहते. तिचं लग्न झालेलं नाही. ती असंच वागते. तिची बहीण देखील सोडून गेलेली आहे. तिची मोठी बहीण देखील तिला घाबरुन इथे राहत नाही. म्हणजे आता काय बोलायचं? मानसिक अस्वस्थ कुणीही होऊ शकतं. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. तिचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असं आहे. तिचं वय माझ्यामध्ये 36 इतकं असेल. तिचं लग्न झालेलं नाही. ती सिंगल आहे. तिला सलमान खान बरोबर लग्न करायचं आहे. सारखं तिचं सुरु असतं की, मला सलमान खान याच्याकडे घेऊन जा. आता मी काय बोलू?”, असं अक्षदा तेंडूलकर यांनी सांगितलं. अक्षदा तेंडूलकर यांनी पुढे असेही सांगितले की, ती तिच्या बाबांना खूप त्रास द्यायची. त्यांचं वय 92 इतकं होतं. ते वयस्कर होते. त्यांना ती खूप त्रास द्यायची. त्यांनी हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. दीड वर्षाआधी ही घटना घडली होती”, अशी माहिती भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी दिली.

Published on: Sep 27, 2024 06:39 PM
सिनेटमध्ये युवासेनेचा पहिला विजय, पाच उमेदवार विजयी अन्…; निकाल जाहीर होताच वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड