Special Report : निवडणूक लढवायला बायको पाहिजे बॅनरचा वाद चिघळला, भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

| Updated on: Jan 30, 2022 | 10:45 PM

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला.

औरंगाबाद : निवडणुकीसाठी उमेदवार बायको (Wife Banner) पाहिजे अशा आशयाचे बॅनर (Ramesh Patil Banner) रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे हा बॅनरचा वाद वाढताना दिसून येत आहे.

Special Report | पुन्हा एकदा पेंग्विनवरून राजकारण तापणार?
पुण्यात 250 जातींच्या गुलाबांचं प्रदर्शन, प्रदर्शनाचं 105 वे वर्ष