सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 11, 2023 | 5:24 PM

VIDEO | सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक यांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि झाली धक्काबुक्की

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. सिंधुदुर्गातील कुडाळ-पावशीमधील जल जीवन मिशनच्या भूमीपूजन कार्यक्रमात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला आहे. वैभव नाईक यांच्या हस्ते होणाऱ्या कुडाळ-पावशीमधील जल जीवन मिशनच्या भूमीपूजन कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होता. मात्र या दोन्ही कार्यकर्त्यांच्या वादाच्या गदारोळात वैभव नाईक यांनी श्रीफळ फोडून कुडाळ-पावशीमधील जल जीवन मिशनचं भूमीपूजन केले आहे.

Published on: Apr 11, 2023 05:24 PM
निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्याचं टीकास्त्र
राधाकृष्ण विखे पाटील लवकरच मुख्यमंत्री होणार? स्वतः विखे पाटलांकडून खुलासा