भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
गुरूवारी संध्याकाळच्या वेळात मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. पोस्टरवर शाई फेक केली आणि कार्यालयातील खुर्च्याही फेकून त्या मोडल्या
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनी केलेल्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक आहेत. मात्र काँग्रसने अपमान केला असं म्हणज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय फोडलं. गुरूवारी संध्याकाळच्या वेळात मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. पोस्टरवर शाई फेक केली आणि कार्यालयातील खुर्च्याही फेकून त्या मोडल्या आणि त्यानंतर हल्लेखोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी चांगलाच लाठीचार्ज केला. पोलिसांनी या हल्लेखोरांना लाठीने चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या मागे पळत त्यांना जबर धुतलं. ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक होत हे भाजपचे कार्यकर्ते नाही तर गुंड असल्याचे म्हणत राग व्यक्त केला. एकीकडे अमित शाह यांचं आंबेडकर यांच्यासंदर्भातील फॅशन आणि स्वर्ग यावरून केलेल्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अमित शाहांच्या विरोधात आंदोलनं सुरू झालीत. तर दुसरीकडे काँग्रेसनेच अपमान केला अशं म्हणत भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडल्याचे पाहायला मिळाले.