मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन, भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांच्या अंगाशी; पोलिसांनी धु-धु धुतलं

| Updated on: Dec 19, 2024 | 5:52 PM

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जबर धुतल्याचे पाहायला मिळाले. याघटनेनंतर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांकडून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण कऱण्यात येत असल्याचे व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी चुप्या पद्धतीने हे आंदोलन केलं, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून आले. अशावेळी पोलिसांकडून अक्षरश: आंदोलकांना रस्त्यावर खाली झोपवून लाठीचार्ज करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 19, 2024 05:51 PM