मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चा, नाशिकचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून, नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वारंवार राज्यातील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. आज अखेर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून, नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वारंवार राज्यातील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. आज अखेर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे.