Kishori Pednekar | बोरीवलीत भाजप कार्यकर्त्याकडून महिलेचा विनयभंग, किशोरी पेडणेकर LIVE

| Updated on: Sep 23, 2021 | 6:43 PM

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता किशोरी पेडणेकरने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते. मात्र आता भाजपची ताईगिरी कुठे गेली असा खडा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे.

भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली? फोन बंद का? असा हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केला.

Devendra Fadnavis | राज्यातील महिला सुरक्षतेवर ठाकरे सरकारने विशेष लक्ष द्यावं : देवेंद्र फडणवीस
Dombivli | डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मनपाडा पोलिसांनी 22 जणांना घेतलं ताब्यात