गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, कोणत्या वेळात असणार लोकल रद्द?
VIDEO | गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्या तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उद्या शनिवैारी, ८ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री ११.३४ वाजता सुटणार आहे.
Published on: Mar 10, 2023 03:35 PM