महापालिकेच्या निवडणुकीबाबत Mumbai मध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक

| Updated on: Jan 25, 2022 | 1:23 PM

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या निवडणुकीबाबत मुंबईमध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक आहे. शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या निवडणुकीबाबत मुंबईमध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक आहे. शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 25 January 2022
nashik महापालिकेने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही – पालिका आयुक्त Kailash Jadhav