ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटली अन् लाखो लिटर पाणी

| Updated on: Mar 27, 2023 | 10:19 PM

VIDEO | ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटून पाणी वाया, बीएमसीवर निष्काळजीपणाचा आरोप करत काँग्रेस आक्रमक

ठाणे : बदलत्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू असताना मात्र याचा फटका मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिनीला बसला आहे. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर कोपरी जवळील हरिओम नगर येथे नाल्याचे काम सुरू असताना बीएमसीची पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली असून त्यामुळे अक्षरशः 5 तासापासून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. दुपारी 2 च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली तरी अद्याप बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी बीएमसीवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. ठाणे आणि मुंबई ही एकमेकांना लागून शहरे आहेत मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा ठाणे शहरातूनच जातो. नेहमी काहीनकाही कामे सुरू असल्याने पाईपलाईन फुटण्याच्या घटना होत असतात. आतापर्यंत या घटनांमुळे अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया गेलं असून मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना काहीच पडलेली नसल्याचा आरोप काँग्रेसचे राहुल पिंगळे यांनी केला आहे.

Published on: Mar 27, 2023 10:19 PM
‘उद्धव ठाकरे यांची महाविकासआघाडीसमोर लाचारी’, कुणी केला हल्लाबोल
शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘त्या’ आरोपाला उदयनराजे भोसले यांचं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?