Air Pollution : वायू प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची शक्कल, मुंबईचे रस्ते पाण्यानं धू-धू धुतले
प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने रस्ते, वर्दळीचे फुटपाथ धुवून काढण्याचे नियोजन केलंय. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणारेय. 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालीये.
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही वर्षांत मुंबईतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. हिवाळा सुरु झाला की हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याचं समोर आलंय. सातत्याने खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे मुंबई महापालिका विशेष उपाययोजना राबवत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने रस्ते, वर्दळीचे फुटपाथ धुवून काढण्याचे नियोजन केलंय. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणारेय. 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालीये. रस्ते आणि फुटपाथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून धूळ प्रतिबंधक यंत्राचा वापर करण्यात येतोय. मुंबईतील वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनानं पावलं उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्या अनुषंगाने वायू प्रदुषणावर उपाययोजनांसाठी अतिरिक्त मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली होती. यात वायूप्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.