मराठी पाट्या न लावणं दुकानदारांना भोवलं, पालिकेकडून कारवाई अन् ‘इतका’ दंड वसूल

| Updated on: Aug 06, 2024 | 4:24 PM

२८ नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईत ९४ हजार ९०३ दुकानदारांनी अधिनियमानुसार मराठी पाट्या न लावल्याचे निदर्शनास आले होते. यातील ९१ हजार ५१५ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या. परंतु मराठी पाट्या न लावणाऱ्या उर्वरित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Follow us on

मराठी पाट्या न लावणं दुकानदारांना चांगलंच भोवलं आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारत मुंबई पालिकेकडून कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत मुंबई पालिकेने १ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, २८ नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईत ९४ हजार ९०३ दुकानदारांनी अधिनियमानुसार मराठी पाट्या न लावल्याचे निदर्शनास आले होते. यातील ९१ हजार ५१५ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या. परंतु मराठी पाट्या न लावणाऱ्या उर्वरित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याचे निर्देश व्यापारी संघटनांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर मुंबई महापालिकेने २८ नोव्हेंबर २०२३ पासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.