बळीराजा हतबल, … अन् कापसाच्या वावरात सोडल्या बकऱ्या
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं भयानक चित्र पाहायला मिळालं आहे. अवकाळी पाऊस त्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल
मुक्ताईनगर, ११ डिसेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं भयानक चित्र पाहायला मिळालं आहे. अवकाळी पाऊस त्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी शेतीसाठी लावलेला खर्चही निघालेला नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याने शेतातील कपाशीच्या वावरात अनेक ठिकाणी शेतकऱ्याने संतापाच्या भरात शेतात बकऱ्या जनावर चारण्यासाठी पाठवल्याचे पाहायला मिळाले. प्रशासन शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही त्यामुळे जिल्हाभरातून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मोठी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published on: Dec 11, 2023 05:24 PM