शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी ‘ही’ जबाबदारी, मुख्यमंत्री शिंदे देणार?

| Updated on: Mar 28, 2024 | 6:02 PM

गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्याचा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे पार पडला.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्याचा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यापक्षप्रवेशानंतर गोविंदांने आपली प्रतिक्रिया दिली. ‘नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपाने पुन्हा या पक्षात आलोय’, असे त्याने म्हटले तर महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे असे म्हणत आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मला कला आणि संस्कृतीसाठी काम करायचे आहे. ही जबाबदारी दिली तर मी सेवा प्रदान करेन, असे त्याने सांगितले.

Published on: Mar 28, 2024 06:02 PM
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, एकाच गाडीतून मुख्यमंत्र्यासोबत प्रवास
लवकरच बरा होऊन… दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?