Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण
चांगली गोष्ट म्हणजे कोविड असूनही मृणालला अतिशय सौम्य लक्षणं आहेत. मात्र तरीही ती स्वतःची चांगली काळजी घेतेय.
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह आलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिनं दिलीय. गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर शाहिद कपूरसोबत तिचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यादरम्यान तिला धावपळ करावी लागली. चांगली गोष्ट म्हणजे कोविड असूनही मृणालला अतिशय सौम्य लक्षणं आहेत. मात्र तरीही ती स्वतःची चांगली काळजी घेतेय. मागच्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोनानं गाठलं होतं.