Salman Khan snake bite | विषारी साप मला तीन वेळा चावला, खुद्द सलमान खानकडून ऐका भयावह घटना

| Updated on: Dec 27, 2021 | 10:07 AM

सापाने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे, अशी माहिती खुद्द अभिनेता सलमान खानने दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला सर्पदंश (snake bite) झाल्याचं वृत्त रविवारी सकाळी आलं आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे सलमानचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातही धाकधूक वाढली होती. मात्र चाहत्यांच्या लाडक्या भाईजानला सहा तासांच्या उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सर्पदंश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे वाढदिवशी सलमानने मीडियाशी संवाद साधताना आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची भयावह आठवण सांगितली.

राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Assembly Session LIVE | विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांना व्हीप