Raza Murad on Saif Attack : ‘त्या’ व्यक्तीला सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला.... या हल्ल्यावर बॉलिवूड अभिनेते रजा मुराद यांनीही भाष्य केले आहे. रजा मुराद यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय. '
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर बॉलिवूड विश्वात एकच खळबळ उडाली तर अनेक सेलिब्रिटींनी यावर संताप व्यक्त केला. या हल्ल्यावर बॉलिवूड अभिनेते रजा मुराद यांनीही भाष्य केले आहे. रजा मुराद यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय. ‘सैफ तरुण आहेत. ते या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले. दुसरा कोणी असता तर वाचला नसता. त्यामुळे ही फक्त चोरी होती की चोरीच्या आड जीव घेण्याचा हेतू होता का? सैफची हत्या करण्यासाठी चोर घुसला होता का? घुसला होता तर कसा घुसला होता? कोणत्या प्रकारे दाखल झाला होता? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले होते. पुढे ते असेही म्हणाले, प्रत्येक घराच्या दरवाज्याला अनेक लॉक्स असतात. सीसीटीव्ही असताना एवढी मोठी घटना घडली एवढी सहज कशी घडली? ही चिंतेची बाब असून हा प्रकार लज्जास्पद असल्याचे रजा मुराद असं म्हटलं. तर काही गोष्टी पोलिसांपर्यंत जात नाही. पण जिथे गोळीबार होतो किंवा घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा या गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे अशा घटनेच्या मूळाशी गेलं पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.