मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल, ….अडचण काय?

| Updated on: Feb 15, 2024 | 4:39 PM

मनोज जरांगे पाटील यांचं आज सलग सहाव्या दिवशी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र आता त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय. तर मनोज जरांगे पाटील यांना औषधोपचार घ्यायला सांगा, फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, अशा सूचनाही हायकोर्टाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचं आज सलग सहाव्या दिवशी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र आता त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचार घेण्यास अडचण काय? असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना औषधोपचार घ्यायला सांगा, फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, अशा सूचनाही हायकोर्टाकडून देण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले असून त्यांनी सरकारला वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. तर जरांगेंना उपचार घेण्याच्या सूचना कळवा, असे निर्देश हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना उपचार घेणं बंधनकारक आहे.

Published on: Feb 15, 2024 04:39 PM
गळाभेट, हातात-हात अन् थोडीशी कुजबुज, विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करणार नाही तर… उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य काय?