दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी मोठा दिलासा, काय म्हणाले अनिल परब?
VIDEO | मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल परब यांना कधीपर्यंत अटकेपासून संरक्षण, बघा काय दिली अनिल परब यांनी प्रतिक्रिया
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनिल परब यांना 20 मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले असल्याचे समोर आले आहे. दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारात अफरातफर केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोलीतील उद्योजक सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर अनिल परब यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी घेत न्यायालयाने अनिल परब यांना अंतरिम दिलासा दिला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. अनिल परब त्यांचे निकटवर्तीय असून, त्यांच्या माध्यमातून परब यांनी ना-विकास क्षेत्रावर साई रिसॉर्ट उभारुन आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात अटकेची टांगती तलवार उभी राहिल्याने अनिल परब यांनी कोर्टात धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली होती.