कसं? दादा म्हणतील तसं, आमचं ठरलंय अन्… बारामतीमधील ‘त्या’ बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष
बारामतीमध्ये आज अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार समर्थकांचा अजित पवारांना असलेला मोठा पाठिंबा पाहायला मिळाला. अजित पवार गटाच्या बुथ कमिटी मेळाव्यात अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
बारामती, 16 फेब्रुवारी 2024 | बारामतीमध्ये आज अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार समर्थकांचा अजित पवारांना असलेला मोठा पाठिंबा पाहायला मिळाला. दरम्यान, बारामतीमध्ये आज अयोजित करण्यात आलेल्या अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळाव्यात अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी बघायला मिळाली. ‘बारामती लोकसभा मतदारसंघात कसं…दादा म्हणतील तसं…’ यासह ‘आमचं ठरलंय आणि वातावरण फिरलंय….’ बारामतीतील बुथ कमिटीच्या मेळाव्यातील अजित पवार गटाच्या समर्थकांच्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. तर या बॅनरची सध्या बारामतीत चर्चा होताना दिसतेय. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा पार पडला त्यावेळी या बॅनरची चर्चा होताना दिसली.
Published on: Feb 16, 2024 05:20 PM