शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अपडेट, कोर्टानं काय दिला निर्णय?
VIDEO | शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट, ठाकरे गटाला नेमका काय दिलासा? बघा...
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्या सर्वांना आज कोर्टाकडून अखेर जामीन देण्यात आला आहे, त्यामुळे साधारण दहा दिवसांनी त्यांची जेलमधून सुटका होणार आहे. या सातही जणांचा आज कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याने उद्या त्यांची जेलमधून सुटका होणार आहे. कोर्टाचा हा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या साच शिवसैनिकांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांचा देखील समावेश होता. दरम्यान, साईनाथ दुर्गे यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता हा निर्णय देण्यात आला.