Video | जळगावमध्ये तलवारीने केक कापला, आणि बर्थडे बॉयची पोलीस स्टेशनमध्ये रवानगी

| Updated on: Jan 26, 2022 | 9:05 AM

वाढदिवसाच्या पार्टीत तलवार नाचवल्याप्रकरणी व तलवारीनं केक कापल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी 'बर्थ डे बॉय'ला अटक केली. वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत तलावरीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत तलवार नाचवल्याप्रकरणी व तलवारीनं केक कापल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’ला अटक केली. वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत तलावरीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. पंकज भानुदास चौधरी (वय 24) असे अटक केलेल्या ‘बर्थ डे बॉय’चे नाव आहे. जोशात असलेल्या या बड्डेबॉयला वाढदिवसाची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली.
उत्पल पर्रीकरांवर भाजपाने अन्याय केला – सामंत
वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण