मालदिवच्या वादावर संजय राऊत यांचं भाष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत म्हणाले…
मालदीवमधील काही नेत्यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्याचे पाहायला मिळाले. या मालदिवच्या वादावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले, 'देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा धिक्कार असो'
नवी दिल्ली, ९ जानेवारी २०२४ : पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मालदीवच्या तीन उपमंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासह मालदीवमधील काही नेत्यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्याचे पाहायला मिळाले. या मालदिवच्या वादावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले, ‘देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा धिक्कार असो’ पुढे ते असेही म्हणाले की, मालदिवची घडामोड ही आंतरराष्ट्रीय आहे असं मी मानत नाही. देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणी अपशब्द काढले असतील तर त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे आम्ही त्यात सामील आहोत, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दर्शवलं. राजकीयदृष्ट्या आम्ही जरी मोदींवर टीका करत असलो तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. मालदीवमधील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाष्य करणं हे या देशातील नागरिकांना मान्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले.