Boycott Maldives : पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचं ट्वीट केलं अन् मालदिवला झोंबलं, पण का?
मालदिवच्या काही मंत्र्यांनी यावरूनच मोदींना ट्रोल केलं. वर्णद्वेषी टीका केली, काहींनी आपमानास्पद टीका केली. कारण मालदीवचं अर्थकारण संपूर्ण तेथील पर्यटनावर अलंबून आहे. त्यामुळे मोदींनी केलेल्या टीकेचा फटका मालदिवला काही तासातच बसला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टिप्पणी करणं मालदिवला चांगलंच महागात पडलं आहे. काही तासातच मालदिवनं यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली. मात्र तोपर्यंत पर्यटनाला मोठा फटका बसला. मोदी यांचा लक्षद्वीप दौरा मालदिवच्या मंत्र्यांच्या चांगलाच डोळ्यात खुपला. काही तासातच मालदिवला याची किंमतही चुकवावी लागली. लक्षद्वीपला जाऊन पंतप्रधान मोदींनी भारताच्या पर्यटनाला चालना दिली. ज्यांना सहासला गवसणी घालायची आहे. त्यांनी लक्षद्वीपला यायला हवं, असं आवाहन मोदींनी केलं. मोदींनी आपल्याच देशातील बेटाचं कौतुक करून पर्यटनाचं आवाहन केलं होतं. मालदिवच्या काही मंत्र्यांनी यावरूनच मोदींना ट्रोल केलं. वर्णद्वेषी टीका केली, काहींनी आपमानास्पद टीका केली. कारण मालदीवचं अर्थकारण संपूर्ण तेथील पर्यटनावर अलंबून आहे. त्यामुळे मोदींनी केलेल्या टीकेचा फटका मालदिवला काही तासातच बसला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट