Radhika Apte | अभिनेत्री ‘बायकॉट राधिका आपटे’ ट्विटर ट्रेंडिंगवर
पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. यामुळे राधिका परत एकदा चर्चेत आली आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. परंतु, आता पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. यामुळे राधिका परत एकदा चर्चेत आली आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ (Parched) चित्रपटातील राधिका अपटे हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात राधिका आपटेसोबत अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत दिसला होता. या दोघांदरम्यान एक न्यूड सीन चित्रित झाला होता. अभिनेत्री राधिका आपटे हिचा हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला होता.
Published on: Aug 13, 2021 11:38 AM