Breaking | संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर राऊत-पवार एकाच गाडीतून निघाले
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत भेटीगाठींचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरु होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
Published on: Jul 17, 2021 07:26 PM