Breaking | मुस्लिम मोहल्ल्यात RSSच्या आयटी सेलची स्थापना करणार; सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
भागवत यांनी मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा निर्माण करण्यात येणार असल्याचं यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी भागवत यांनी मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा निर्माण करण्यात येणार असल्याचं यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. चित्रकूट येथे 9 जुलैपासून संघाचं चिंतन शिबीर सुरू झालं होतं. हे शिबीर ऑनलाईन होतं. त्याचा आज समारोप करण्यात आला. यावेळी संघात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे शिबीर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी पश्चिम बंगाल आणि मुस्लिम समुदायाला संघाशी जोडून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.