Breaking | तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयाबाहेर
दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, यापुढील चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन खडसे यांनी दिल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
भोसरी एमआयडीसी जमिन कथित गैरव्यवहार प्रकरणात आज माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे हे सकाळी 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री 8 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्याही उपस्थित होत्या. दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, यापुढील चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन खडसे यांनी दिल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.