बृजभूषण सिंह यांचा अमित शाह यांना फोन, काय झाली चर्चा?

| Updated on: Jan 20, 2023 | 1:00 PM

गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह या दोघांमध्ये फोनवरून झाली ८ मिनिटं चर्चा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर देशातील स्टार महिला कुस्तीपटू यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. यानंतर बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. आता बृजभूषण सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अमित शाह यांना स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी अमित शाह आणि बृजभूषण सिंह या दोघांमध्ये ८ मिनिटं चर्चा झाली. तर आज बृजभूषण सिंह हे पत्रकार परिषद देखील घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते कोणती भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत. देशातील स्टार महिला कुस्तीपटू यांनी लैंगिक शोषणाचे बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप केले, या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि संगिता फोगाट यांच्या नेतृत्वात महिला कुस्ती पटूंनी रेसलिंग फेडरेशनविरोधात आंदोलन पुकारले आहे.

दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सदिच्छा सानेची हत्याच, जीवरक्षकानेच घेतला जीव
तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच राहुल गांधी यांना भेटले; भेट होताच दोघांची गळाभेट