शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब, ‘या’ दिवशी शिवरायांची वाघनखं मुंबईत येणार

| Updated on: Sep 30, 2023 | 3:39 PM

VIDEO | शिवरायांची वाघनखं लंडनहून परत आणण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार असून ती वाघनखं पुढील तीन वर्षासाठी भारतात असणार आहे. तर महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी असणार

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे स्वराज्यावरच मोठं संकट दूर झालं होतं. अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखं शिवरायांनी वापरली होती. ती वाघनखं ब्रिटनच्या ताब्यात आहेत. मात्र आता शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे आता लवकरच परदेशात असणारी वाघनखं भारतात परत आणण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली, ती येत्या १६ नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालयासोबत ३ ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखे भारतात असणार आहेत. व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालय ३ वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झाले आहे. महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देणारं एक परिपत्रक सांस्कृतिक विभागाने काढले आहे.

Published on: Sep 30, 2023 03:35 PM