Nagpur | नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपाचा तटस्थ राहण्याचा निर्णय : संदीप ताजणे

Nagpur | नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपाचा तटस्थ राहण्याचा निर्णय : संदीप ताजणे

| Updated on: Dec 06, 2021 | 6:38 PM

आता नागपूरचा गड काँग्रेस कसा जिंकणार, असा प्रश्न निर्माण होतोय. विधान परिषद निवडणुकीत बसपानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे वर्सेस छोटू भोयर यांच्यात लढत होईल. बसपा तटस्थ राहणार असल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर जागेसाठी चुरशीची लढत आहे. भाजप वर्सेस काँग्रेस असा थेट सामना आहे. भाजपनं जोरदार तयारी केली आहे. त्यामानानं काँग्रेस प्रचारात थंडावल्याचं दिसतंय. यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेरून उमेदवार का आयात केला म्हणून संतप्त आहेत. तर उमेदवार आमच्यापर्यंत येत नसल्यानं मतदार संभ्रमात आहेत. आता नागपूरचा गड काँग्रेस कसा जिंकणार, असा प्रश्न निर्माण होतोय. विधान परिषद निवडणुकीत बसपानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे वर्सेस छोटू भोयर यांच्यात लढत होईल. बसपा तटस्थ राहणार असल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार सारखेच असल्याचं बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी सांगितलं.

Rajesh Tope | जिनोमिक सिक्वेन्स लॅबमध्ये वाढ करणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
Pankaja Munde | ओबीसी आरक्षणासाठी भयंकर हानी, आरक्षण अध्यादेश स्थगितीवर पंकजा मुंडेंचं ट्विट