वर्चस्व कायम, सलग सातव्यांदा प्रतापराव जाधव यांची मेहकर बाजार समितीवर सत्ता

| Updated on: Apr 30, 2023 | 10:15 AM

VIDEO | सलग सातव्यांदा बुलढाण्यातील मेहकर बाजार समितीवर खासदार प्रतापराव जाधव यांच वर्चस्व कायम

बुलढाणा : सलग सातव्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांची मेहकर बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. शिवसेना (शिंदे) विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी लढत असताना मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार प्रतापराव जाधव यांचाच बोलबाला या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाच पैकी तीन ठिकाणी महाविकास आघाडी तर दोन ठिकाणी भाजप – शिवसेनेला मतदारांनी कौल दिला आहे. यामधे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सातव्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध इतर सर्व पक्ष असा अटीतटीचा सामना असताना सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा खासदार प्रतापराव जाधव यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. मतदारांनी दिलेल्या कौलामुळे सातव्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत भूमिपुत्र शेतकरी विकास पॅनलने आपला झेंडा रोवला आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या मतदारांचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहेत.

Published on: Apr 30, 2023 10:15 AM
मुश्रीफ-घाटगे संघर्ष; कारण फक्त एकच बाजार समिती! काय होणार याची कागलकरांना धाकधूक
मुंबईतून पुण्याकडे प्रवास करणार असाल तर बातमी आवश्य वाचा; अन्यथा ट्रॅफिकमध्ये फसाल