बाप रे बाप… अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही भल्यामोठ्या गारांचा खच तसाच अन्…
गारांचा पाऊस एव्हढा होता की 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप कायम असून गारा अद्याप विरघळली नाहीये. त्यामुळे या भागातील गरांची तीव्रता कशी होते हे दिसतेय. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलीचो गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले
बुलढाणा, २८ फेब्रुवारी २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. कुठं निबांच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळे शेड नेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालाय. मात्र गारांचा पाऊस एव्हढा होता की 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप कायम असून गारा अद्याप विरघळली नाहीये. त्यामुळे या भागातील गरांची तीव्रता कशी होते हे दिसतेय. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलीचो गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकसानीची पंचनामे सुरु झाले आहे. या नुकसाना नंतर आता शेतकऱ्यांना फक्त शासनाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील गहू हरभरा मकासह संत्रांपिकांचे सुद्धा गारपीटने नुकसान झाले आहे.