आम्ही बैलगाडा शर्यत कधी बंद पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस
आज पिंपरी चिंचवडमधील बैलगाडा शर्यतीला (Bull Cart Race) फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस एका वेगळ्याच पोशाखात दिसून आले.
पुणे : बैल कधी एकटा येत नाही तो जोडीनं येतो आणि नांगरासकट येतो. हा डायलॉग आपण आजपर्यंत फक्त मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) या चित्रपटात ऐकला असेल. मात्र हाच डायलॉग आज पिंपरी-चिंचवडमधून विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मारला आहे. यावेळी अशा प्रकरची डायलॉगबाजी करत फडणवीसांनी तुफान बॅटिंग केली, तसंच विरोधकांना कडकडीत इशाराही दिली. आज पिंपरी चिंचवडमधील बैलगाडा शर्यतीला (Bull Cart Race) फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस एका वेगळ्याच पोशाखात दिसून आले. त्यांनी या पोषाखाचीही स्टोरी सांगतली आहे. हा उत्साह पाहून मनापासून आनंद झाला, एका मित्राने विचारलं भाऊ हा ड्रेस कसा घातला, जसं बैलगाडा शर्यतीसाठी बैलना सजवल जातं तसं मला हा ड्रेस महेश लांडगे यांनी दिला, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आम्ही बैलगाडा शर्यत कधीही बंद पडू देणार नाही, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.