महागाईच्या भस्मासुराचे दहन करत राष्ट्रवादीच्या आमदारानं केला सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Mar 06, 2023 | 11:09 PM

VIDEO | महागाईच्या भस्मासुराचे दहन करत राष्ट्रवादीच्या आमदाराने केला भाजप सरकारचा निषेध, बघा काय म्हणाले?

अकोला : राज्यभरात होळीचा उत्साह आहे. तर कोकणात देखील शिमगोत्सवाची जोरदार तयारी असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील होळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींच्या घरी देखील होळीचा जल्लोष होतोय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज त्यांच्या घरी होळी साजरी केली. यावेळी त्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले यावेळी त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला. यात भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात आज होळीला चक्क सिलेंडर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचे निषेध करणारे बॅनर होळीवर लावून होळीचे दहन करून भाजप सरकारचा निषेध केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 06, 2023 11:09 PM
शरद पवार असं का म्हणताय, शहाण्याबद्दल विचारा; बघा TV9 चा स्पेशल रिपोर्ट
Pune PMPML Strike : तब्बल ३० तासानंतर पुण्यात पुन्हा धावणार PMPML