पोटच्या मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्… मुंबईच्या वरळी सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल प्लाझावर एका व्यावसायिकाने दक्षिण मुंबईला जायचं आहे, असं सांगून एका वाहन चालकाकडे लिफ्ट मागितली. आपली कार बंद पडलीय असे सांगून त्याने लिफ्ट घेतली. सी लिंकच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी चालकाला कार थांबवायला सांगितली.
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वरळी सी-लिंकवरून उडी घेऊन एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. या व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल केल्याची माहिती मिळतेय. तर भावेश सेठ असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. दरम्यान, आर्थिक चणचणीतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तीन तासांच्या मोहिमेनंतर आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल प्लाझावर त्यांनी दक्षिण मुंबईला जायचं आहे, असं सांगून एका वाहन चालकाकडे लिफ्ट मागितली. आपली कार बंद पडलीय असे सांगून त्याने लिफ्ट घेतली. सी लिंकच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी चालकाला कार थांबवायला सांगितली. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने व्हॉट्स अॅपवरुन त्याच्या 22 वर्षाच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला. आपण आयुष्य संपवत आहोत, अशी कल्पना दिली.