Balasaheb Thorat Live | पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा : बाळासाहेब थोरात

| Updated on: Nov 18, 2021 | 6:28 PM

विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय.

विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखण्यास सुरुवात झालीय. त्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे.

फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशी एखादी दु:खद घटना घडली तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु. दरम्यान, नाना पटोले आणि थोरात यांनी फडणवीसांची वेगळी भेट घेतली. त्याबाबत विचारलं असता, नाना पटोले यांचं विमान होतं. तसंच त्यांच्या घरी शुभकार्य आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ते फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हीही विनंती करा असं सांगितल्याचं थोरात म्हणाले.

Asaduddin Owaisi | महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही पण रस्त्यावर उतरायचे का?
Asaduddin Owaisi | महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही पण रस्त्यावर उतरायचे का?