मंत्रिमंडळात तरूण अन् नवे चेहरे? अमित शाह यांच्या शिंदे-फडणवीस यांना काय सूचना?
VIDEO | एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा, दिल्लीवारीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही का दिल्लीवारीला गेले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि यांच्यात दोन तास बैठक झाली. तर या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, राज्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराता तरूण आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी सूचना अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच शिवीगाळ करणाऱ्या आणि आक्षेपाहार्य वर्तन करणाऱ्या नेत्यांनाही मंत्रिमंडळातून दूर ठेवा असेही अमित शाह यांनी सांगितले. तर राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जास्त परिश्रम करण्याचा सल्ला अमित शाह यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील निवडणुकांबाबतही चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.