अशोक चव्हाणांचे राईट हँड विजय वडेट्टीवार लवकरच भाजपात, चर्चेचा साक्षीदार; कुणाचा खळबळजनक दावा?

| Updated on: Apr 11, 2024 | 1:05 PM

कॅबीनेटमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील मोठा दावा केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसोबत विजय वडेट्टीवार यांच्या बैठका झाल्या, मी त्या चर्चेचा साक्षीदार आहे. मी आदिवासी माणूस, आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही. अशोक चव्हाण याचे विजय वडेट्टीवार हे राईटहँड आहेत,

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपूर्वी काही राजकीय नेते करत आहे. अशातच कॅबिनेटमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील मोठा दावा केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसोबत विजय वडेट्टीवार यांच्या बैठका झाल्या, मी त्या चर्चेचा साक्षीदार आहे. मी आदिवासी माणूस, आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही. अशोक चव्हाण याचे विजय वडेट्टीवार हे राईटहँड आहेत, ते भाजपात आले. नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे हे भाजपात आलेय. त्यानंतर लवकरच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार असल्याचे आत्राम म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी “घर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे पैसे आहे, पण बुद्धी नाही” अशी टीका केली होती. या टीकेनंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार भाजपात येण्याचा मोठा दावा केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, “राष्ट्रवादीकडून मी गडचीरोली लोकसभा मतदारसंघातून लढावं, अशी पक्षाची इच्छा होती. पण मला तिकीट मिळालं नाही, जागा भाजपकडे गेलीय. महायुतीचा नेता म्हणून मी अशोक नेतेसाठी प्रचार करतोय विदर्भात १० जागाही महायुती जिंकणार”, असा विश्वासही व्यक्त केला.

Published on: Apr 11, 2024 01:05 PM
‘उंची छलांग लगाने के लिये चिता..’, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर राजू पाटलांची पोस्ट चर्चेत
मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी; म्हणाल्या, आमचं म्हणणं आम्ही मांडलं…