Modi 3.0 Cabinet : मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? बघा संपूर्ण यादी
मोदी यांनी सलग तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तर या मोदी 3.0 कॅबिनेटचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी सरकारने 30 केंद्रीय कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 20 राज्यमंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर केलं आहे.
नुकतीन नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तर या मोदी 3.0 कॅबिनेटचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी सरकारने 30 केंद्रीय कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 20 राज्यमंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर केलं आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पुन्हा गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा परिवहन आणि रस्ते मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पुन्हा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. बघा इतर मंत्र्यांना कोणतं मिळालं खातं?
Published on: Jun 11, 2024 10:42 AM