नितीन गडकरी यांच्या खात्यातील कामांवर कॅगचं बोट, ‘गडकरी यांचा काटा काढण्याचा डाव?’ कुणाचा आरोप?

| Updated on: Aug 18, 2023 | 11:31 PM

VIDEO | भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार, कॅगने काय ओढले ताशेरे? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | कॅगच्या एका रिपोर्टमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या ७ प्रकल्पांचा आणि योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा ठपका केंद्रावर कॅगने ठेवलाय. ७ योजनांपैकी नितीन गडकरी यांच्या खात्यांतील ३ कामांवर कॅगने ताशेरे ओढलेत. मात्र नितीन गडकरी काटा काढण्याचा डाव असल्याची शंका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केलीये. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. कॅगचा अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आले असून या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Published on: Aug 18, 2023 11:29 PM
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा, कसं असणार भाजपचं मिशन लोकसभा?
आशिष शेलार यांच्या ‘त्या’ तक्रारीमुळेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित? ठाकरे बंधू सरकारवर भडकले