अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
मुंबई : विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात (Corona) मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. हे नुकसान भरुन काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं (School Education Minister) एक मोठा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.