एमआयएमचे खासदार इम्तिजाय जलील यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
VIDEO | छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे कारण?
छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांच्यासह अनेक नामांतर विरोधी संघटनांनी शहराच्या नामांतराविरोधात बेमुदत उपोषण पुकारले आहे. अशातच या आंदोलनााचा एक भाग म्हणून काल शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला होता. या कँडल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतरही जलील यांच्या नेतृत्वात हजारो जणांनी मेणबत्ती घेऊन मार्च काढला. त्यामुळेच इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात पोलिसांनी जलील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.