Malik VS Kamboj | माझा आवाज दाबू शकत नाही, मी मलिकांना घाबरत नाही : मोहित कंबोज
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. ड्रग्ज सेवन करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. ड्रग्ज सेवन करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. मोहित कंबोज स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवत असे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्यातील हितसंबंधांचा पर्दाफाश केला. मुंबईत मोहित कंबोज याच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरून कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील, असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.