पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड, कोण माजवतंय दहशत?

| Updated on: Oct 11, 2024 | 1:33 PM

पुण्यात जनता वसाहत परिसरात रात्री गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली असून मद्यपान केलेल्या टोळक्याने १० ते १५ वाहनांची मोठी तोडफोड केली

पुण्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना थांबायचं काही नाव घेत नाही. एकीकडे कोयता गँगने शहरात पुन्हा धुमाकूळ घालत असताना आता काही टोळक्यांकडून दहशत माजवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात जनता वसाहत परिसरात रात्री गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जनता वसाहतीत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आहे. या टोळक्यांकडून बऱ्याच वाहनांची तोडफोड कऱण्यात आली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील जनता नवसाहत गल्ली नंबर ४७ मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळतेय. दारूच्या नशेत असणाऱ्या टोळक्याने साधारण १५ वाहनांवर बांबूने तसेच दगडाने हल्ला करत मोठी तोडफोड केली. या घटनेमुळे जनता वसाहत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी तातडीने या गुंडांचा आणि दहशत माजवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे.

Published on: Oct 11, 2024 01:33 PM