Gautami Patil : गौतमी पाटील हिला बोलवणं कुणाला पडलं महागात?
VIDEO | परवानगी नाकरली असताना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आयोजकाला चांगलंच महागात पडलं आहे. नवी मुंबईतील कामोठे शहरात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
पनवेल, १४ ऑक्टोबर २०२३ | गौतमी पाटील आणि वाद सध्या वादाचं समीकरणच बनलं आहे. दरम्यान, विनापरवानी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आयोजकाला चांगलंच महागात पडलं आहे. नवी मुंबईतील कामोठे शहरात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शांततेत पार पडल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर कोणताही गुन्हा कामोठे पोलिसांनी दाखल केला नाही. मात्र १२ ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यातील वावजे गावात एका वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिला सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला पनवेल तालुका पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नसताना देखील गौतमीला आणून अवैध पद्धतीने लोकांची गर्दी केल्यानं या कार्यक्रमाच्या आयोजकांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.