एकनाथ शिंदे यांना धक्का! सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
VIDEO | शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली माहिती
मुंबई : शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाहीतर सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत आमदार सदा सरवणकर गोळीबार प्रकरणाविषयी ही महत्त्वाची माहिती दिली. राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली. यासह आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Published on: Mar 25, 2023 05:44 PM