बीड मतदारसंघात बोगस मतदान? ‘त्या’ आरोपांनंतर वाद थेट निवडणूक आयोगात, नेमकं का घडलं?

| Updated on: May 22, 2024 | 11:18 AM

परळीच्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप केला. आधी शरद पवार गटाच्या बबनराव गितेंनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय. नंतर एक पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याआधीही रोहित पवारांनी निवडणुकीत झालेल्या गैर प्रकाराचे व्हिडीओ ट्वीट करत आयोगावर ताशेरे ओढले.

बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याच्या आरोपांचं प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलंय. याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला होता आणि त्याबद्दल सारं काही व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं मतदान कसं झालं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारे काही खळबळजनक व्हिडीओ समोर येत आहे. परळीच्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप केला. आधी शरद पवार गटाच्या बबनराव गितेंनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय. नंतर एक पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याआधीही रोहित पवारांनी निवडणुकीत झालेल्या गैर प्रकाराचे व्हिडीओ ट्वीट करत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. माहितीनुसार, निवडणूक आयोगाने बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना नोटीस बजावली. पण कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याचा आरोपही विरोधकांकडून होतोय.

Published on: May 22, 2024 11:18 AM
मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी बातमी… 23 ते 31 मेपर्यंत CSMT स्थानकात ब्लॉक, ‘या’ रेल्वे गाड्या रद्द
देशात पुन्हा मोदीच येणार? महायुती की मविआ कोण जिंकणार? प्रशांत किशोर यांचं मोठं भाकीत काय?